
Nagpur Municipal Election
sakal
नागपूर : यंदाची मनपा निवडणूक काहीशी वेगळी ठरणार असल्याचे संकेत पक्षांतर्गत सूत्रांनी दिले आहेत. भाजप मनपा निवडणुकीत जवळपास ७० ते ७५ टक्के माजी नगरसेवकांची तिकिटे कापण्याच्या तयारीत आहे. पक्षाने यंदा नव्या चेहऱ्यांवर, विशेषतः तरुण कार्यकर्त्यांवर भर देण्याचे ठरवले आहे. यामुळे ‘युवा ब्रिगेड’ला संधी देत मनपात नवीन नेतृत्व घडवण्याचा भाजपचा निर्धार दिसत आहे.