शक्तिमानच्या मित्रांनेच दिली टीप; दगडाने ठेचून केला होता खून

शक्तिमानच्या मित्रांनेच दिली टीप; दगडाने ठेचून केला होता खून

नागपूर : कौशल्यानगरातील स्वयंम नगराळे या युवकाच्या हत्याकांडानंतर सहा मित्रांनी आरोपी शक्तिमान गुरूदेव याचे अपहरण करून घटनास्थळावर नेऊन दगडाने ठेचले. या प्रकारामुळे कौशल्यानगरातील नागरिक चांगलेच चिडून आहेत. शक्तिमानचे काही साथिदार अद्याप बेपत्ता आहेत. कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता असल्यामुळे कौशल्यानगरात तणावपूर्ण शांतता असून परिसराला छापणीचे स्वरूप आले आहे. (Murder-Eight-people-Arrested-Nagpur-Crime-News-nad86)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजनी पोलिसांनीच अवैध धंदेवाल्यांशी साठगाठ केल्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. आठ दिवसांपूर्वीच नागरिकांना शक्तिमान गुरूदेव याची दहशत आणि दारूविक्रेते, जुगार अड्डा संचालकांविरुद्ध अजनी पोलिसांनी लेखी तक्रार दिली होती. परंतु, अवैध धंदेवाल्यांशी अर्थपूर्ण संबंध ठेवणाऱ्या अजनी पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे अजनी पोलिसांवर नागरिक चिडून होते. त्यातच स्वयंमने परिसरातील अवैध धंद्याविरुद्ध आवाज उचलत नागरिकांची बाजू लावून धरली होती.

शक्तिमानच्या मित्रांनेच दिली टीप; दगडाने ठेचून केला होता खून
अमानुष प्रकार! चौथीच्या विद्यार्थिनीला २०० उठाबशांची शिक्षा

स्वयंममुळे जुगार अड्डा बंद पाडण्याची भीती असल्यामुळे शक्तिमान ऊर्फ शिवम गुरूदे, निशांत घोडेस्वार आणि त्याचे साथिदारांनी ‘गेम’ करण्याचा कट रचला होता. त्यानुसार शुक्रवारी रात्री दहा वाजता स्वयंमचा चाकूने भोसकून खून केला. स्वयंमच्या हत्याकांडामुळे वस्ती पेटून उठली. सहा युवकांनी झोपेत असलेल्या अजनी पोलिस पोहचण्यापूर्वीच शक्तिमानचे भांडेवाडीतील मामाच्या घरातून दुचाकींनी अपहरण केले. कौशल्यानगरात आणून त्याला नागरिकांनी दगडाने ठेचले. तो मेडिकलमध्ये व्हेंटीलेटरवर शेवटच्या घटका मोजत असताना त्याचा मृत्यू झाला.

अजनी पोलिसांचे कारनामे

अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पास्कल दारूवाला, नागोबा मंदिराजवळील सऱ्या आणि जयस्वाल यांना थेट पोलिस अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे. हत्याकांड घडल्यानंतरही तिन्ही दारूचे गुत्थे अजूनही सुरू आहेत. गेल्या आठवड्यात जयस्वाल या दारूविक्रेत्यांकडून २० हजार रुपये अजनी पोलिसांनी उकळले होते. जयस्वालने थेट डीसीपी कार्यालयात अर्ज करून तक्रार केली होती. परंतु, जयस्वाल दमदाटी केल्यानंतर त्याला तक्रार परत घेण्यास भाग पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शक्तिमानच्या मित्रांनेच दिली टीप; दगडाने ठेचून केला होता खून
नागपुरात डबल मर्डर : पोलिसांच्या नाकावर टिच्चून शक्तिमानचा खून

मित्रानेच दिली टीप

स्वयंमच्या हत्येनंतर आरोपी शक्तिमान हा फरार झाला होता. तो भाडेप्लॉट चौकातील मामाकडे असल्याचे त्याचा मित्राला माहिती होते. त्यानेच स्वयंमच्या मित्रांना शक्तिमानची टीप दिली, अशी खळबळजक माहिती समोर आली आहे. शक्तिमानची माहिती देणाऱ्या युवकाचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

आठ गजाआड

स्वयंम याच्या हत्येप्रकरणात अजनी पोलिसांनी कुख्यात शक्तीमान याचे दोन साथीदार निशांत घोडेस्वार व अमन मेश्राम या दोघांना अटक केली. तर दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. शक्तीमान याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणात पोलिसांनी बिरजू वसंता शिंदे (वय २८), अभिजीत दिलीप घोडेस्वार (वय २४), आकाश कृष्णा मनवर (वय ३०), प्रितम अंबादास कावले (वय २४), सुनील वामन वानखेडे (वय ३९) व सुरेश गोपीचंद कांबळे या सहा जणांना अटक केली. आठही जणांची पोलिसांनी २८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी घेतली आहे.

(Murder-Eight-people-Arrested-Nagpur-Crime-News-nad86)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com