प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या; भावाला दिली होती धमकी

प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या; भावाला दिली होती धमकी

हिंगणा (जि. नागपूर) : पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुमगाव परिसरात तीस वर्षीय तरुणाची गळा आवरून हत्या करण्यात आली. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सुखदेव देवाजी विरखडे (३०, रा. नवीन गुमगाव) असे मृताचे नाव आहे. (Murder-from-a-love-affair-Murder-In-Nagpur-Gramin-Nagpur-Crime-News-nad86)

सुखदेव हा सोमवारी (२६) घरून निघाला होता. दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा भाऊ त्याला शोधत असताना बुधवारी (ता. २८) वागधरा-गुमगावच्या वेणा नदीवरील पाणीपुरवठा योजनेच्या पंप हाउसजवळ त्याचा मृतदेह आढळला. लागलीच याची माहिती हिंगणा पोलिसांना देण्यात आली. मृताचे दोन्हीही हात दुपट्ट्याने बांधले होते. शिवाय त्याच्या गळ्यालासुद्धा दुपट्टा गुंडाळला होता. त्याच दुपट्ट्याचा अर्धा भाग वर रेलिंगला बांधला होता.

प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या; भावाला दिली होती धमकी
मेळघाटात वाघांची संख्या अर्धशतकावर; संवर्धनात ‘टॉप थ्री’मध्ये

सुखदेवला गळा आवळून मारल्यानंतर इमारतीच्या रेलिंगला लटकवून आत्महत्या दर्शविण्याचा प्रयत्न आरोपीने केला असावा, असा संशय पोलिसांना आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक तपासणी पथक बोलावण्यात आले. पोलिस उपायुक्त नरुल हसन, सहायक पोलिस आयुक्त परशुराम कार्यकर्ते, हिंगण्याचे पोलिस निरीक्षक सरीन दुर्गे घटनास्थळ तपासणीनंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. हिंगणा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सुखदेवचे गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. तिचे लग्न ठरल्यानंतर भावासोबत सुखदेवचा चारपाच दिवसांपूर्वी वाद झाला. यातच मुलीच्या भावाला बघून घेण्याची धमकी दिली होती. यातूनच ही हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना असून दोन संशयितांना पोलिसांनी विचारपूस करायला ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

(Murder-from-a-love-affair-Murder-In-Nagpur-Gramin-Nagpur-Crime-News-nad86)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com