आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन : मेळघाटात वाघांची संख्या अर्धशतकावर; संवर्धनाच्या दृष्टीने मेळघाट ‘टॉप थ्री’मध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेळघाटात वाघांची संख्या अर्धशतकावर; संवर्धनात ‘टॉप थ्री’मध्ये

मेळघाटात वाघांची संख्या अर्धशतकावर; संवर्धनात ‘टॉप थ्री’मध्ये

अमरावती : मेळघाट मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वतरांगेत वसलेले अभयारण्य आहे. खंडू, खापर, सिपना, गडगा आणि डोलार या चार नद्या मेळघाटमधून वाहतात. संवर्धनाच्या दृष्टीने विचार केल्यास देशातील टॉप थ्रीमध्ये मेळघाट व्याघ्रप्रकल्पाची गणना होते. येथे जवळपास ५० च्या आसपास वाघांची संख्या आहे. (International-Tiger-Day-tigers-in-Melghat-In-the-top-three-in-conservation-Tiger-Story-News-nad86)

विसाव्या शतकात सुरुवातीला जगभरात एक लाखांच्या आसपास वाघांची संख्या होती. यापैकी दोन हजारांच्यावर वाघ हे भारतीय उपखंडात दिसून येतात. मेळघाटचे जंगल हे राज्यातील जंगलांच्या तुलनेत जैवविविधतेचे भंडार आहे. घनदाट जंगलात माखला, चिखलदरा, चिलादारी, पातुल्डा आणि गुगामल ही अतिशय दुर्गम ठिकाणे आहे. हिरवीगार चादर पांघरलेला हा परिसरातील विस्तीर्ण पसरलेले तळे, उंचावरून कोसळणारे धबधबे मन मोहून टाकतात.

हेही वाचा: अमरावती : वाहनातून साडेतीन कोटींची रक्कम पकडली, सहा जण ताब्यात

गुगामल राष्ट्रीय उद्यान ३६२.२८० चौ. की.मी. मेळघाट वन्यजीव अभयारण्य ७८८.७५० चौ.की.मी. नरनाळा वन्यजीव अभयारण्य १२.३५० चौ. कि.मी. वाण अभयारण्य २११.००६ चौ.की.मी. अंबाबरवा अभयारण्य १२७.११० चौ.की.मी. असा मेळघाट व्याघ्रप्रकल्प अस्तित्वात आला. वाघ आणि बिबट्यांसह इतरही वन्यजीव येथे विशेषत्वाने आढळून येतात. भारतातील दहा व्याघ्रप्रकल्पापैकी एक असलेला मेळघाट व्याघ्रप्रकल्प देशातील सर्वांत मोठ्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे.

वाघांची थरकाप उडविणारी डरकाळी, निर्धास्त चाल असे सर्वसामान्य माहिती आहे. परंतु, वाढत्या लोकसंख्येमुळे वाघांच्या अधिवासावरही आक्रमण होऊ लागल्याचे चित्र गत काही वर्षापासून दिसून येते. वाघोबांच्या जंगलाचे अस्तित्व सुरक्षित व्हावे आणि पुन्हा तीच वाघांची डरकाळी घुमावी यासाठी वनविभागाने वन्यजीवप्रेमींनी झटण्याची गरज आहे.

मेळघाटात शिकारीचे प्रमाण नगण्य

नैसर्गिक अधिवास नष्ट होणे आणि चोरटी शिकार या बाबी वाघांची संख्या कमी होण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याची बाबत विशेषत्वाने दिसून येते. मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचा विचार केल्यास फार कमी ठिकाणी शिकारीच्या घटना घडल्याचे दिसून येते.

वाघ ही जंगलाची शान आहे. वनविभागाकडून संवर्धन आणि संरक्षणाच्या उपाययोजना नेहमीच केल्या जातात. मेळघाट व्याघ्रप्रकल्प जिल्ह्याची शान आहे.
- पीयूषा जगताप, विभागीय वनअधिकारी, मेळघाट वन्यजीव विभाग

(International-Tiger-Day-tigers-in-Melghat-In-the-top-three-in-conservation-Tiger-Story-News-nad86)

टॅग्स :International Tiger Day