esakal | संबंधास नकार देणाऱ्या प्रेयसीचा खून; इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याचा प्रियकराचा बनाव
sakal

बोलून बातमी शोधा

The murder of a lover who refuses to have intercourse Nagpur crime news

जाविद हा बांधकामाच्या ठिकाणी चौकीदारीचे काम करीत होता. त्याचठिकाणी सारिका देखील त्याच्यासोबत राहत होती. दहा दिवसांपूर्वी ते दीपकनगर येथील मनोज बागडे यांच्या नवनिर्मित इमारतीच्या बांधकामावर कामासाठी आले होते. याच कामावर इतर मजूर देखील राहत होते.

संबंधास नकार देणाऱ्या प्रेयसीचा खून; इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याचा प्रियकराचा बनाव

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : क्षुल्लक वादानंतर प्रेयसीने प्रियकराला संबंधासाठी नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात वीट घालून खून केला. त्यानंतर ती इमारतीवरून पडून मृत झाल्याचा देखावा निर्माण करीत पोलिसांची दिशाभूल केली. मात्र, पोलिसांनी हत्याकांडाचा उलगडा करीत महिलेच्या प्रियकराला अटक केली. सारिका शंकर पटेल (३३, रा. सुदामनगरी, अंबाझरी) असे मृत प्रेयसीचे नाव असून, मोहम्मद जाविद मोहम्मद युसूफ शेख (३८, रा. बैतुल, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिकाचे लग्न झाले होते. परंतु, पतीसोबत पटत नसल्याने तीन-चार वर्षांपासून ती वेगळी राहत होती. त्याचप्रमाणे जाविदसुद्धा विवाहित आहे. त्यानेही पत्नीला सोडून नागपुरात कामानिमित्त राहत होता. चार वर्षांपूर्वी सारिका आणि जाविद यांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघेही ‘लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशिप’मध्ये राहू लागले.

अधिक वाचा - कोरोनामुळे अख्ख कुटुंब हादरलं, दोन तासाच्या अंतराने घेतला बाप-लेकाचा बळी

जाविद हा बांधकामाच्या ठिकाणी चौकीदारीचे काम करीत होता. त्याचठिकाणी सारिका देखील त्याच्यासोबत राहत होती. दहा दिवसांपूर्वी ते दीपकनगर येथील मनोज बागडे यांच्या नवनिर्मित इमारतीच्या बांधकामावर कामासाठी आले होते. याच कामावर इतर मजूर देखील राहत होते.

क्षुल्लक कारणावरून वाद

३१ मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास दोघांनीही जेवण केले. दोघांत क्षुल्लक कारणावरून वाद झाला. वादावादीनंतर सारिका ही इतर मजुरांकडे गप्पा मारण्यासाठी निघाली. ती गेटजवळ पोहोचताच जाविदने पहिल्या मजल्यावरून तिला वीट फेकून मारली. डोक्यावर वीट लागल्याने ती जागीच कोसळली. जाविदने आरडाओरड केल्याने इतर मजूर घटनास्थळी गोळा झाले. जाविदने तिला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता.

अधिक माहितीसाठी - रणजित सफेलकरची पोलिसांनी काढली धिंड; अनवाणी पायाने, बरमुड्यावरच नेले न्यायालयात

असे आले हत्याकांड उघडकीस

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळ संशयास्पद वाटत होते. जाविदही वारंवार घटनेबाबत वेगवेगळी माहिती देत होता. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी तेथील सीसीटीव्हीची पाहणी केली असता जाविदने सारीकाचा खून केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून जाविद शेख यास अटक केली.

loading image
go to top