नागपूर : नागपूर आणि खून हे समीकरण झाले आहे. दिवसाला एक खून होतो अशीच परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद उफाळून खून होतो. मात्र, बुधवारी नागपूर जिल्ह्यातील उमरेड व नरखेड तालुक्यात दोन खून झाल्याच्या घटना घडल्या. दोन्ही खून पैशाच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. एकाचा पैशाच्या वादातून गळा कापला तर दुसऱ्याचा विटाने ठेचून खून केला. यामुळे चाललंय तरी काय, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
नरखेड तालुक्यात खुनाची शृंखला थांबता थांबत नसल्याचे चिन्ह दिसत आहे. सतत सुरू असलेल्या खुनाच्या मालिकेत आज पुन्हा एका घटनेने भर पडली. बेलोना मार्गावर परसोडी शिवारात, ज्ञानेश्वर कळंबे याच्या शेतात बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास शहजाद अबुल लईक शेख (वय ३०) याचा मृतदेह ‘मॉर्निंग वॉक’ला करणाऱ्यांना आढळला. त्यापैकी एकाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविला.
शहजाद अब्दुल लईक शेख हा व्याजाने पैसे द्यायचा. पैशाच्या देवाणघेवाणीवरून शहजादची धारदार शस्त्राने हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढली तपास जयपालसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनात एपीआय ब्रामदेव देशमुख करीत आहेत.
या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही व्यक्तींनी शहजादकडून पैसे उधार घेतल्याची चर्चा आहे. पैशाच्या वसुलीसाठी शहजादने दोन्ही संशयितांना शिवीगाळ केल्याचे समजते. चिडून दोन्ही संशयितांनी शहजादला घटनास्थळी बोलावून हत्या केल्याचे कळते. दोन्ही संशयित हे अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते.
डोक्यात वीट घालून मित्राचा खून
बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उमरेड बायपास रोड, रेल्वे गेट नंबर २ येथे विटा डोक्यांवर मारून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना घडली. घटनेतील आरोपी व मृतात पैशाचा व्यवहार झाला होता. त्या व्यवहारावरून दोघांमध्ये वाद वाद झाला. मृत हा गुन्हेगार प्रवृत्तीचा होता. तो बरेचदा मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगून आला होता. परिसरामध्ये त्याची दहशत होती.
मृताचे नाव पिंट्या ऊर्फ प्रवीण विनायक कठाणे (वय ३६, रा. मुळे ले-आऊट, उमरेड) तर आशिष सुरेश गजभिये असे आरोपीचे नाव आहे. आशिष हा ओम पॉलीटेक्निक गेटच्या बाजूला राहतो. या दोघांमध्ये आज दुपारी पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपीने पिंट्याच्या डोक्यावर विटांचा प्रहार करून जागीच लोळवले. आरोपी घटनास्थळावरून सरळ पोलिस ठाणे गाठले व आत्मसमर्पण केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.