नाल्याच्या पाइपातून श्वानांनी काढली वस्तू अन् सर्वच झाले स्तब्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाल्याच्या पाइपातून श्वानांनी काढली वस्तू अन् सर्वच झाले स्तब्ध

नाल्याच्या पाइपातून श्वानांनी काढली वस्तू अन् सर्वच झाले स्तब्ध

नागपूर : पाच दिवसांपासून नागपुरातून बेपत्ता असलेल्या युवकाचा खून करून खाप्यातील खेकरा नाल्याच्या पाइपात मृतदेह फेकून देण्यात आला. ही खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीस आली. प्रदीप जनार्धन बागडे (४७, रा. अजनी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. हत्याकांडाला अनैतिक संबंधाची किनार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पवन चौधरी आणि सुमित चौधरी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप बागडे हा नरेंद्रनगर परिसरात चायनिजचा ठेला लावत होता. बागडेने १६ सप्टेंबरला शेवटचा कॉल बायकोला केला होता. तो कॉल फक्त २० सेकंदाचा होता. नेटवर्क प्रॉब्लेममुळे आवाज व्यवस्थित येत नसल्याने बागडेच्या पत्नीला काहीही कळले नाही. त्यानंतर मात्र फोन स्विच ऑफ झाला. १७ सप्टेंबरला त्याच्या कुटुंबीयांनी अजनी पोलिस ठाण्यात प्रदीप बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. अजनी पोलिसांनी गांभीर्य दाखवून लगेच सीडीआर काढला. प्रदीपच्या फोनचे लास्ट लोकेशन वरून शहरात दाखवत होते. जे खाप्यापासून १३५ किमी अंतरावर आहे.

हेही वाचा: वीस वर्षांनंतर पहिल्याच पतीशी पुनर्विवाह; पत्नीने केला होता दुसरा विवाह

असे आले हत्याकांड उघडकीस

खेकरा नाल्याच्या पाइपातील प्रदीपचा कुजलेला मृतदेह कुत्र्यांनी बाहेर काढला. सोमवारी सकाळपासून अनेकांना मृतदेह दिसला. परंतु, कुणीही पोलिसांनी माहिती दिली नाही. मंगळवारी ढाबा चालक हिंगे याने पोलिसांना माहिती दिली. खापा पोलिसांचे पथक घटनास्थळावर पोहोचले. मृताच्या खिशात सापडलेल्या ड्रायव्हिंग लायसनवरून प्रदीपची ओळख पटली. पोलिसांनी अजनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली.

दोन आरोपींना अटक

दोन आरोपींनी प्रदीप यांच्या पोटात धारदार शस्त्र खुपसून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी खेकरा नल्याच्या पाइपमध्ये प्रदीपचा मृतदेह लपविला. त्यानंतर आरोपी पळून गेले. हत्याकांड उघडकीस येताच दोन्ही आरोपींना अजनी पोलिसांनी माग काढला. पवन आणि सुमित यांची माहिती काढली. दोन्ही आरोपींनी अजनी पोलिसांनी अटक केली. यासाठी उपायुक्तांच्या सायबर विभागाची मदत घेण्यात आली. हत्याकांडाचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.

टॅग्स :Crime News