
नागपूर : भरवस्तीत रॅश ड्रायव्हिंगवरून (Rash driving) दोन गटातील वाद विकोपाला गेला. त्यातूनच एका युवकाची शस्त्राने वार करीत खून (murder) करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री कोतवाली हद्दीतील गणेशनगरात घडली. घटनेनंतर परिसरात तणाव आहे. सैफ अली ऊर्फ शाहरुख शौकत अली (२६, रा. अलीमियॉ खांब, तुळशीबाग, महाल) असे मृताचे नाव आहे. (Murder of a youth over a rash driving dispute)
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशनगर भागात गेल्या काही दिवसांपासून दुचाक्या वेगात चालविण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. भरवस्तीतूनही वाहने दामटली जात असल्याने स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. स्थानिक युवकांनी एकत्र येत वेगात गाडी चालविणाऱ्यांना समजही दिली. पण, त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. परिणामी, स्थानिक युवक आणि बाहेरून येऊन जोरात वाहन चालविणारे असे दोन गट आमोरासमोर उभे ठाकले.
अलीगडेच ग्रेट नाग रोडवरील झुणका भाकर केंद्राजवळ दोन्ही गटातील युवकांमध्ये वाद झाला. यानंतर गणेशनगरातील युवकांनी वाहनचालकांना धडा शिकविण्याचा चंग बांधीत शोध मोहीम सुरू केली. यासाठी ते वस्तीतच एकत्र बसत होते. रविवारीसुद्धा शोधमोहीम सुरू होती. रात्री ११ च्या सुमारास सैफ अली गणेशनगरातील आराध्या ज्वेलर्सजवळील कुळकर्णी यांच्या घराजवळ बुलेटवर बसून होता.
आधीच चिडून असलेले बाबल्या, विनायक, आर. के. पटेल, बंटी जैन आणि इतरांनी सैफला खडसावणे सुरू केले. आपला काहीच संबंध नसल्याचे तो सांगत होता. पण, आरोपी चिडून असल्याने वाद वाढला. त्यातच आरोपींनी शस्त्राने वार केले. सोबतच गटारावरील झाकण उचलून डोक्यावर फटका हाणला. यामुळे घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.
त्याची हालचाल थांबल्याचे लक्षात येताच आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून घेत आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
(Murder of a youth over a rash driving dispute)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.