esakal | कामठीत सलून चालकाचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

काही ग्राहकांची दाढी बनवत असताना आरोपी आकाश हाटे नामक युवक ‘माझी दाढी आधी बनवून दे. मला ओळखत नाही का, मी कोण आहे तुला माहीत नाही का, माझ्यापूर्वी अन्य व्यक्तीला का बसविले’, असे म्हणून त्याने सलून मालकाशी वाद घातला. 

कामठीत सलून चालकाचा खून

sakal_logo
By
सतीश डहाट

कामठी (नागपूर) : जुनी कामठी पोलिस ठाणे हद्दीत येणाऱ्या न्यू खलाशी लाइन परिसरातील सलून चालकाचा दाढी बनविण्याच्या क्षुल्लक वादातून खून झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी नऊ वाजतादरम्यान घडली. सुदेश हंसराज थुले (५०) रा. न्यू खलाशी लाइन, कामठी असे मृताचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत हे कित्येक वर्षांपासून सलूनचे काम करायचे. खलाशी लाइन परिसरात त्यांचे सुदेश कटिंग नावाने दुकान आहे. आज मृताच्या चुलत पुतणीचे कामठी रोडवरील सभागृहात लग्न होते. लग्नसमारंभ आटोपून सायंकाळी त्यांनी दुकान उघडले. काही ग्राहकांची दाढी बनवत असताना आरोपी आकाश हाटे नामक युवक ‘माझी दाढी आधी बनवून दे. मला ओळखत नाही का, मी कोण आहे तुला माहीत नाही का, माझ्यापूर्वी अन्य व्यक्तीला का बसविले’, असे म्हणून त्याने सलून मालकाशी वाद घातला. 

अधिक वाचा : ‘चॅलेंज’ स्वीकारत असाल तर सावधान!

दरम्यान, मृताच्या नातेवाइकांनी वाद सोडविला. मात्र, आरोपीने आपला अपमान समजून मनाला लावून घेतले आणि रागाच्या भरात आपल्या साथीदारासह पुन्हा दुकानावर धडकला. कटिंग सलून दुकानावर हल्ला चढवीत मृताला लाकडी दांडूसह गळा दाबून जिवानिशी ठार केले. माहिती मिळताच जुनी कामठी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत होते.

संपादन : मेघराज मेश्राम 

loading image
go to top