Nagpur News: नागपूर हादरलं; संगीत शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ
Nagpur crime: नागपूरमधील एका नामांकित शाळेतील संगीत शिक्षकाने १७ वर्षीय विद्यार्थिनीवर अनुचित वर्तन केले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर : बेलतरोडी भागातील एका बड्या शाळेतील संगीत शिक्षकाचे १७ वर्षीय विद्यार्थिनीवरच प्रेम जडले. तिला फिरायला नेऊन त्याने तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करीत, शिक्षकाला अटक केली.