Nagpur Newssakal
नागपूर
Nagpur News: डम्पिंगसाठी खणलेले खड्डे पावसाने पाण्याने भरले; त्यात पडून बालकाचा मृत्यू
Nagpur Accident: काटोल तालुक्यातील खानगाव पारधी बेड्यावर डम्पिंग यार्डच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून मूकबधिर बालकाचा मृत्यू झाला. नागरिकांनी खड्डे तात्काळ बुजवण्याची आणि जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
काटोल : जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील खानगाव पारधी बेड्यावर मंगळवारी सकाळी १० वाजता एक हृदयद्रावक घटना घडली. कचरा डम्पिंगच्या खड्ड्यात पडून विराट राणा पवार (वय १२) या मूकबधिर बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.