
नागपूर : वाढत्या कोरोनाबाधितांमुळे महापालिकेने बंधन लावल्याने यंदा होळी, धुळवडीच्या उत्साहावर विरजण पडले आहे. २९ मार्चला धुळवडीच्या दिवशी मटण तसेच भाजीपाला, किराणा दुकाने (स्टॅन्ड अलोन) दुपारी एक वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. त्यामुळे मांसाहाराच्या शौकिनांना मटण खरेदीसाठी तत्परता दाखवावी लागणार आहे.
शहरात दररोज अडीच ते तीन हजार बाधित आढळून येत आहेत. त्यामुळे शहरासाठी महापालिका प्रशासनाने निर्बंध लावले आहेत. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज होळी व धुळवडीसाठी विशेष आदेश काढले. होळी, धुळवडीला पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. सार्वजनिकरित्या होळी, धुळवड साजरी करण्यास बंदी लावण्यात आली आहे. मिरवणूक काढण्यासही बंदी लावण्यात आल्याने एकत्रितरीत्या फिरून होळीचा आनंद लुटता येणार नाही. धुळवडीच्या दिवशी स्टॅन्ड अलोन स्वरुपातील मटण, मासे, अंडी, भाजीपाला, किराणा दुकाने दुपारी एक वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.
हॉटेल्स, रेस्टॉरंटमधून पार्सल सुविधा -
धुळवडीला हॉटेल्स, रेस्टॉरंट, उपाहारगृहातील प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहील, परंतु पार्सल सुविधा सायंकाळी सातपर्यंत सुरू राहणार आहे. याबाबतही आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
आज, उद्या सर्व दुकाने चारपर्यंत -
महापालिकेने २० मार्चला काढलेल्या आदेशानुसार शनिवार तसेच रविवारीही दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. याशिवाय हॉटेल, रेस्टॉरंट दोन्ही दिवशी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार असून पार्सल सुविधा रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहील.
ग्रामीणमध्ये चारवाजेपर्यंत -
ग्रामीण भागात भाजीपाला, मटन, अंडी, चिकनची दुकाने धुळवडीला दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. उमरेड, भिवापूर, कुही तालुक्यांत हॉटेल, रेस्टॉरंट रात्री आठ वाजेपर्यंत तर इतर तालुक्यात पाच वाजेपर्यंत सुरू राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.