व्यस्त पालकांना मुलांवर नजर ठेवणे सोपे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mylin application helpful to teachers for targeting students

व्यस्त पालकांना मुलांवर नजर ठेवणे सोपे

नागपूर : नोकरी-व्यवसायात व्यस्त असलेले अनेक पालक आपल्या पाल्यांच्या शालेय बाबींचा ट्रॅक व्यवस्थित ठेवू शकत नाही. प्रगती किंवा त्यांच्या कमजोरीवर नजर आणि त्याविषयी नोंदी ठेवू शकत नाही. त्याबाबत शिक्षकांसोबत नेहमी चर्चा करणे शक्य होत नाही. आता हे एका अॅपमुळे सोपे होणार आहे.

‘मायलिन’ हे त्या ॲप्लिकेशनचे नाव. शिक्षक, पालक आणि व्यवस्थापन यांच्यातील दुवा म्हणून या अॅपकडे बघितले जाते. शिक्षकांना हजेरी घेत उपस्थितीचा ट्रॅक मेंटेन करता येतो. पालकांना वर्गातील शिकवणीची अचूक स्थिती कळू शकते. तर व्यवस्थापनाला एकूण खर्च आदी बाबींवर नजर ठेवणे शक्य होते.

नागपूर महापालिकेच्या पाच शाळांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून हे ॲप्लिकेशन सध्या वापरले जात आहे. यात मराठीसह, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. राज्यातील ५६ खासगी शाळांनी यावर कामकाज सुरू केले आहे.

या अॅपमुळे काम सोपे होईल, वेळ वाचेल. शिक्षकांचा नोंदी करण्यात जो कारकुनी वेळ वाया जातो तो विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सत्कारणी लागेल. झेनवर्क सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडची ही निर्मिती असून अॅप हाताळण्याचे शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. सोबतच मोबाईल, इंटरनेट सुविधा आणि राऊटर पुरविण्यात येते. मनोज देशपांडे आणि सुरेंद्र ब्रह्मे या कंपनीचे संस्थापक असून नागपूरकर सिद्धार्थ रॉय शासकीय प्रकल्प हाताळत आहे.

ॲपची वैशिष्ट्ये

शिक्षक : हजेरी घेणे, गृहपाठ देणे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या नोंदी, पालकांना सूचना पाठविणे

पालक : पाल्याची वार्षिक प्रगती, वर्गातील शिकवणीची माहिती, शिक्षकांशी चॅट, सूचना मिळवणे

व्यवस्थापन : कार्यालयीन कामकाजास मदत, शुल्काच्या नोंदी, खर्चाचे व्यवस्थापन, उपक्रमांच्या नोंदी

Web Title: Mylin Application Helpful To Teachers For Targeting Students

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top