Nagarparishad Nagarpanchyat Election
sakal
नागपूर - जिल्ह्यातील २७ नगर परिषद व नगरपंचायतींच्या निवडणूक होत आहेत. बुधवारी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले असून, या प्रक्रियेनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्यास सुरुवात झाली आहे. आघाडी करून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना समान चिन्ह देण्यात आले, तर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्यांची अधिकृत चिन्हे मिळाली. उद्यापासून प्रचारजोश वाढणार आहे.