
PM Kisan Samman Nidhi
sakal
नागपूर : पंतप्रधान किसान सन्मान निधी या शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनेत अनियमिततेची प्रकरणे उघड झाली आहेत. नागपूर जिल्ह्यातील तपासणीत एकाच कुटुंबातील सदस्यांनी अनेकदा लाभ घेतल्याची १ हजार २७४ प्रकरणे समोर आली आहेत. यात पती- पत्नीच्या नावे शेती असलेल्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. हा निधी होल्ड केला असून, कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.