

Nagpur Minor Girl Torture Case 16 Year Old Allegedly Beaten Cigarette Burns and Threatened Five People Booked
sakal
नागपूर: अल्पवयीन मुलीला घरात डांबून ठेवत तिला सिगारेटचे चटके देत, मारहाण करण्याची धक्कादायक घटना यशोधरानगरात समोर आली आहे. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, घराबाहेर गेल्यास तिला आणि तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे समोर आले आहे.