Nagpur : ‘स्वाइन फ्लू’मुळे २२ मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swine Flu update news

Nagpur : ‘स्वाइन फ्लू’मुळे २२ मृत्यू

नागपूर : कोरोनाचा उद्रेक कमी झाला. मृत्यूवर नियंत्रण आले. मात्र, स्वाइन फ्लूचा उद्रेक वाढला असून बुधवारी (ता.२०) मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकीत नव्याने २२ स्वाइन फ्लूच्या मृत्यूंवर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे स्वाइन फ्लू मृतकांचा आकडा ४६ वर पोहचला. आतापर्यंत शहरातील स्वाइन फ्लूबाधितांचा आकडा ५८७ वर गेला.

नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात स्वाइन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीची बैठक पार पडली. बैठक झाली नसल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केल्यानंतर बैठक घेऊन नागपूर शहरातील स्वाइन फ्लू बाधित आणि मृत्यूचे विश्लेषण करण्यात आले.

दरम्यान, स्वाइन फ्लूची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने सुरक्षात्मक काळजी घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत शासकीय रुग्णालयांमधील स्वाइन फ्लू तज्ज्ञ डॉ. गुंजन दलाल, डॉ. मिलिंद सूर्यवंशी, डॉ. राजरत्न वाघमारे, मनपाचे साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे व खासगी रुग्णालयांमधील स्वाइन फ्लू तज्ज्ञ उपस्थित होते.

समितीसमोर ३० स्वाइन फ्लू संशयित रुग्णांच्या मृत्यू विषयी माहिती ठेवण्यात आली. त्याचे विश्लेषण केले असता यापैकी २२ रुग्ण स्वाइन बाधित होते तर इतर ८ जणांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

स्वाइन फ्लू टाळण्यासाठी हे करा

 • -हात सातत्याने साबण व पाण्याने धुवा

 • -गर्दीमध्ये जाणे टाळा

 • -स्वाइन फ्लू रुग्णापासून किमान ६ फूट दूर रहा

 • - खोकताना व शिकताना तोंडाला रुमाल लावा

 • - भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी

 • -पौष्टिक आहार घ्या

हे टाळा

 • -हस्तांदोलन अथवा आलिंगन

 • - सार्वजनिक ठिकाणी थुंकणे

 • -डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे

 • स्वाइन फ्लूचे मृत्यू

 • नागपूर शहर १५

 • नागपूर ग्रामिण ६

 • इतर जिल्ह्यातील १४

 • इतर राज्यातील ११

Web Title: Nagpur 22 Deaths Due Swine Flu Disease Death Analysis Committee Report

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..