Nagpur Crime: जुन्या वादातून युवकाचा खून; जुनी मंगळवारीतील गुजरी चौकात थरार, चौघांना अटक
Nagpur News: नागपूरच्या गुजरी चौकात जुन्या वादातून हर्षल सौदागर या २६ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. लकडगंज पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.
नागपूर : जुन्या वादातून चौघांनी मिळून २६ वर्षीय युवकाचा खून केला. ही थरारक घटना रविवारी (ता.२७) मध्यरात्री जुनी मंगळवारीतील गुजरी चौकात घडली. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली.