Nagpur Crime: बँक व्यवस्थापकाच्या घरात जबरदस्ती शिरला ३१ वर्षीय तरुण अन्...धंतोलीतील थरारक घटना

धंतोलीतील दिनानाथ हायस्कूलजवळील अग्नी अपार्टमेंट येथे राहणाऱ्या एका बँक व्यवस्थापकाच्या घरात जबरदस्ती शिरून ३१ वर्षीय युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला.
Nagpur Crime
Nagpur CrimeEsakal

Nagpur Crime: धंतोलीतील दिनानाथ हायस्कूलजवळील अग्नी अपार्टमेंट येथे राहणाऱ्या एका बँक व्यवस्थापकाच्या घरात जबरदस्ती शिरून ३१ वर्षीय युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (ता.२२) सांयकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली. दरम्यान कुमार रिशूसिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शंकर भीमा धुर्वे (वय ३१, रा. वसंतराव नाईक झोपडपट्टी),असे युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग हे धंतोलीतील सेंट्रल बँक ऑफ इंडियात मुख्य व्यवस्थापक आहेत. २२ मार्चला सायंकाळी सिंग यांच्या पत्नी मुलगा व मुलीला शिकवणी वर्गातून घेऊन घरी परतल्या. दरम्यान शंकर हा घरात घूसला.

त्याने दरवाजा बंद केला. सिंग यांच्या पत्नी व मुले घाबरली. माझ्या मागे काही काही जण असून, मला मारायला येत आहेत, तुम्ही चुप रहा, मला चाकू द्या, असे तो सिंग यांच्या पत्नीला म्हणाला. सिंग यांच्या पत्नी मुलांना घेऊन घराबाहेर आल्या. सिंग यांच्या पत्नीने बाहेरून दरवाजा बंद केला.

सिंग यांच्या पत्नीने मदतीसाठी आरडाओरड केली. सुरक्षारक्षक, चालक व अन्य एक जण तेथे आले. त्यांनी युवकाला आवाज दिला. त्याने प्रतिसाद दिला नाही. याचदरम्यान त्याने शोकेसची काच फोडून काचेने पोटावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दरवाजा उघडला असता शंकर हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. एका नागरिकाने धंतोली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. त्यांनी जखमी शंकरला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला याचा तपास पोलिस करीत आहेत. (Latest Marathi News )

Nagpur Crime
PMPML Bus News : पी.एम.पी.एल. बस मधून प्रवास करताना सोन्याच्या चैन लंपास ; चार दिवसात दोन घटना,३७ ग्रॅम वजनाचे सोने चोरीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com