नागपूर : महापालिकेच्या ‘अमृतवनाने’ वाढला पक्षांचा किलबिलाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur 5000 tree plantation in Shivangaon Municipal Parks Department

नागपूर : महापालिकेच्या ‘अमृतवनाने’ वाढला पक्षांचा किलबिलाट

नागपूर : तीन वर्षांपूर्वी महापालिकेने शिवणगाव परिसरात केलेल्या वृक्षलागवडीमुळे मोठे ‘अमृतवन’`तयार झाले आहे. या परिसरात हिरवळीसोबतच आता पक्षांचा किलबिलाटही वाढला आहे. तेथे १२ हजार १०० चौरस मीटर जागेत ५० पेक्षा जास्त प्रजातींची ५ हजारावर झाडे लावण्यात आली आहे.

वाढत्या शहरीकरणातही हिरवे नागपूर, सुंदर नागपूर ही ओळख अबाधित ठेवण्याचे महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहे. महापालिका शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून झाडांची संख्या वाढवित आहे. त्यामुळे हिरवळ वाढत असून नागरिकांना शुद्ध ऑक्सिजन मिळत आहे. याच श्रृंखलेत मनपाच्या उद्यान विभागाने तीन वर्षांपूर्वी शिवणगाव भागात केलेल्या वृक्षलागवडीने अमृतवन निर्माण झाले. मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी शुक्रवारी या उद्यानाची पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, उपायुक्त रविन्द्र भेलावे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार उपस्थित होते.

उद्यान विभागाने येथे लावलेल्या झाडांची तीन वर्षात चांगलीच वाढ झाली असून येत्या काळात हा संपूर्ण परिसर विविध फुलझाडे, फळझाडांनी बहरणार आहे. शिवाय येथील वृक्ष मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती करून सभोवतालचे वातावरण आल्हाददायी करण्यात महत्वाची भूमिका निभावणार आहेत. शिवणगाव भागातील या उद्यानाच्या प्रवेश मार्गावर आकर्षक पद्धतीने पाम आणि विद्येच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे हा परिसर आकर्षक झाला आहे. फुलझाडांमुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. फळ आणि फुलझाडांच्या वनआच्छादनाने परिसरात पशु, पक्ष्यांसाठी निवारा निर्माण केला आहे.

उद्यानात खारुताईच्या मुक्त संचारासोबतच झाडांवर विविध पक्ष्यांची घरटी दिसून येत असून पक्ष्यांचा किलबिलाट हा सुखावह अनुभव देतो. लाफिंग डव, बुलबुल, ग्रीन बी ईटर, सनबर्ड, लार्ज ग्रे बॅबलर, इंडियन लाबिंग यासारखे अनेक पक्षी तसेच मोर हा राष्ट्रीय पक्षीही येथे दिसतात.

अमृतवनात लावण्यात आलेली झाडे

फुलझाडे ः चाफा, कनक चाफा, डिस्मेरियन पाम, जास्वंद, गुलाब.

फळझाडे ः रामफळ, आंबा, चिकू, डाळींब, पेरू, सीताफळ,

बोर, जांभूळ.

इतर झाडे ः पिंपळ, आपटा, कदंब, कडूनिंब.

Web Title: Nagpur 5000 Tree Plantation In Shivangaon Municipal Parks Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top