नागपूर : ५१ टन कोळसा चोरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coal heist

नागपूर : ५१ टन कोळसा चोरला

कन्हान : वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत वेकोलि इंदर खुली कोळसा खाण येथून ५१ टन ४५० किलो (किं.२ लाख ५७ हजार) रुपयांचा कोळसा चोरून विकणाऱ्या ट्रक चालकास वेकोलि सुरक्षा अधिकाऱ्यांनी पकडून कन्हान पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी परसुराम गौतम (वय २९, रा. शिवनगर झोपडपट्टी, कांद्री) या विरुध्द गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

या कोळसा खाणीचा कोळसा डुमरी रेल्वे कोळसा यार्डला वाहतूक करून पोहचविण्याचे कंत्राट बी.एल.ए. कंपनीकडे आहे. त्यांच्याकडील कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांनी इंदर खुली कोळसा खाणीतून आधी २६ टन कोळसा भरून रेल्वे यार्डात कोळसा न पोहचविता दुसरीकडे नयाकुंड येथील कोळसा टालवर नेऊन विकला.

यानंतर पुन्हा या खाणीतून २५ टन ४५० किलो कोळशा ट्रकमध्ये भरून डुमरी रेल्वे यार्ड येथे कोळसा खाली न करता समोर बालाजी पेट्रोल पंप समोर कांद्रीकडे नेताना वेकोलि सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षकांनी विचारले असता ट्रक चालकाने कोळसा चोरीची कबुली दिली. यानंतर वेकोलि सुरक्षा अधिकाऱ्यांनी कन्हान पोलिसांना बोलावून आरोपी ट्रक चालक परसुराम माखन गौतम यास ट्रकमध्ये भरलेल्या २५ टन ४५० किलो कोळसासह ताब्यात घेतले.

याप्रकरणी कन्हान पोलिसांनी वेकोलि सुरक्षा रक्षक रवी कंडे यांच्या तक्रारीवरून कोळसा चोरणा-या ट्रक चालका विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. कन्हान पोलिस निरिक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पो. सहा. निरिक्षक महादेव सुरजुसे पुढील तपास करीत आहे.

Web Title: Nagpur 51 Tons Of Coal Heist Accused Arrested Action Security Officer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top