Nagpur 70 lakhs daily Hookah sales
Nagpur 70 lakhs daily Hookah sales

Nagpur News : रोज ७० लाखांची हुक्का विक्री : ३५० कोटींवर उलाढाल

मुंबई, दिल्लीतून येतो माल; सेलिब्रेशनमध्ये वापर
Published on

नागपूर : तरुणाईमध्ये सध्या हुक्क्याची क्रेझ कमालीची वाढली असल्याने एकट्‍या नागपूर शहराचा बाजार कोट्यवधीच्या घरात गेला आहे. प्राप्त माहितीनुसार दररोज ७० लाखांहून अधिक रुपयांचा हुक्का शहरात विकला जात असून ३५० कोटींवर या व्यवसायाची वार्षिक उलाढाल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तरुणांचे कुठलेही सेलिब्रेशन आजकाल मद्य आणि हुक्क्याशिवाय होताना दिसून येत नाही. त्याचाच फायदा घेत, शहरातील पॉश वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरू झाले आहेत. कोरोना निर्बंध हटल्यानंतर महाविद्यालयातील वर्ग ऑफलाइन सुरू झाले. त्यामुळे परगावाहून शिकण्यासाठी येणाऱ्या तरुणांची संख्या शहरात वाढली आहे. अतिशय सहजरित्या कुठल्याही मोठ्या पानठेला असो वा कॅफेमध्ये त्याची विक्री होताना दिसून येते. गुजरातवरुन मुंबई आणि तिथून नागपुरात सहजरित्या आणला जातो. याशिवाय दिल्ली हे सुद्धा या मालाचा विक्रीचे दुसरे डेस्टिनेशन आहे. दोन ते अडीच तासाच्या नशेसाठी युवकही सहज पाचशे ते सहाशे रुपये देताना दिसून येतात. त्यामुळे महिन्याला १७ ते १८ कोटी असे वर्षाला ३५० कोटींवर त्याची उलाढाल होते.

पोलिसांची कारवाई पण हुक्का सुरूच

गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने गुन्हे शाखेकडून हुक्का पार्लरवर छापे टाकण्यात येत आहे. मात्र, तंबाखुजन्य पदार्थ आढळल्याशिवाय त्यांना कुठल्याच कारवाईचे अधिकार नसते. याचाच फायदा घेत, कॅफे, बार आणि रेस्टॉरेन्टचे मालक पळवाटा काढताना दिसून येतात. समोर हर्बल हुक्का दिसत असला तरी, आतून तंबाखूजन्य फ्लेवरची सर्रास विक्री सुरू असते.

या वस्‍त्यांमध्ये प्रमाण अधिक

शहरात प्रतापनगर, सदर, त्रिमूर्तीनगर, वर्धमाननगर, बजाजनगर, अंबाझरी, नंदनवन आदी ठिकाणी असलेल्या कॅफेमध्ये तर वर्धा येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खापरी परिसरातील अनेक रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना हुक्का दिला जातोय. सायंकाळ झाली तरुणाई याठिकाणी फक्त हुक्काची ''ट्रिप'' अनुभवण्यासाठीच येथे पोहोचतात. मात्र, कायद्याचा आधार घेत, या हुक्का पुरवणाऱ्यांना कुठलीही भीती नसल्याचे चित्र उपराजधानीत आहे.

अनेकदा हुक्का पार्लरवर कारवाई करताना, रेस्टॉरेन्ट, पब आणि कॅफेचालक हे हर्बल हुक्क्याचा आधार घेत असल्याचे दिसून येते. मात्र, पोलिसही पक्क्या माहितीच्या आधारेच छापे टाकत असल्याने त्यांच्यावर कारवाई होईल याच दिशेने तपास करीत असतात.

-किशोर पर्बते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, युनिट ३ गुन्हे शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com