

नागपूर : राज्यात अभियांत्रिकीच्या प्रवेशाचा प्रक्रिया सुरू आहे. यामधील पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण करीत, थेट द्वितीय वर्षाच प्रवेश करणाऱ्या ७० टक्के विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील जागेच्या कमतरतेमुळे प्रवेश मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी भटकंती होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दहावीनंतर बरेच विद्यार्थी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमात प्रवेश घेतात. तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना त्या-त्या शाखेत थेट अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश दिल्या जातो. गेल्या काही वर्षांच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमात रिक्त जागांचे प्रमाण वाढल्याने त्यामधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली. याशिवाय अभियांत्रिकीमध्येही रिक्त जागांचे प्रमाण वाढले. त्यामुळे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने थेट प्रवेशासाठी असलेला कोटा २० टक्क्यांवरुन १० टक्क्यावर आणला. मात्र, गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे निकालात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
पॉलिटेक्निक पदविका झालेले ७० टक्के विद्यार्थी प्रवेशाविना
त्यामुळे दोन्ही शाखांमध्ये प्रवेशही वाढले. त्यातून रिक्त जागांचे प्रमाण घटले. त्यामुळे महाविद्यालयात थेट द्वितीय वर्षात प्रवेशासाठी यंदा जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातूनच विद्यार्थ्यांनी समकक्ष पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यावरही त्यांच्यावर प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. विशेश म्हणजे, २ नोव्हेंबरपासून थेट द्वितीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणीस सुरुवात करण्यात आली. शनिवारपर्यंत महाविद्यालयात दुसऱ्या फेरीच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आले. मात्र, बऱ्याच महाविद्यालयात मर्यादित प्रवेश असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नसल्याची माहिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.