Eyes Disorder : मुलांमध्ये वाढतोय डोळ्यांच्या कॅन्सरचा धोका, डोळ्यांचा पडदा स्कॅन करून भविष्यात आजाराचे अचूक निदान

डॉ. महिपाल सचदेवा देशव्यापी संशोधन सुरू; मुलांमध्ये वाढतोय डोळ्यांच्या कॅन्सरचा धोका
retinoblastoma eyes
retinoblastoma eyesesakal

नागपूर - भविष्यात आजाराचे निदान करून मानवी शरीरातील बदलांचा वेध घेणे शक्य आहे. डोळ्यांच्या पडद्यावर रक्तवाहिन्या असतात. रक्तवाहिन्या विविध मानवी आजाराचे संकेत देतात. अलीकडे प्रवासात शॉपिंग मॉल असो की, विमानतळ येथे डोळ्यांचे पडदे स्कॅन करतात. डोळयांचा पडदा स्कॅन केल्यानंतर विविध प्रकारच्या आजाराचे निदान होऊ शकते, आजाराचे निदान करणारे डोळे हा एकप्रकारचा दर्पण आहे. अशा आर्टिफिशियल इंटेलिजंसच्या माध्यमातून भविष्यातील आजाराचा धोका ओळखता येईल, असा विश्वास जागतिक दर्जाचे नेत्ररोग शल्यचिकित्सक डॉ. महिपाल सचदेवा यांनी आज येथे व्यक्त केला.

देशव्यापी सुपर स्पेशालिटी नेत्र चिकित्सेतील प्रमुख तसेच न्यू दिल्ली सेंटर फॉर साइट फाउंडेशनचे डॉ. सचदेवा बुधवारी (ता.२७) नागपुरात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पारंपारिक पद्धतीने आजाराचे निदान करण्यासाठी मल, मूत्र, रक्त, सिटिस्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी आणि बायोप्सी यासारख्या चाचण्या करतो. मात्र डोळ्यांचा पडदाच्या तपासणीतून विविध प्रकारच्या आजाराचे निदान होईल, यावर देशव्यापी संशोधन सुरु झाले हे, असे डॉ. सचदेवा म्हणाले. यावेळी नागपुरातील रेटिना तज्ज्ञ डॉ. अजय अंबादे उपस्थित होते.

मुलांमध्ये वाढतो ‘रॅटिना ब्लास्टोमा’

लहान मुलांमध्ये डोळ्यांचा कॅन्सरला वैद्यकीय भाषेत ‘रॅटिना ब्लास्टोमा’ म्हणतात. या कॅन्सरमुळे पूर्वी मुलांचे प्राण किंवा कायमचे अंधत्व येत होते. हैदराबाद येथील न्यू दिल्ली सेंटर फॉर साइट फाउंडेशन त्यावर ‘फ्लाक थेरेपी’ द्वारे सर्जिकल रॅटिना उपचार केले जातात. मेक इन इंडियाने त्यासाठी पुढाकार घेतला असून उपचारावरील खर्च ११ लाख रुपयांवरून ६० हजारांवर आणला आह. त्यामुळे अकाली दगावणाऱ्या मुलांच्या प्राणासोबतच त्यांची अंधत्वातून मुक्तता होत आहे, असेही डॉ. सचदेवा म्हणाले.

retinoblastoma eyes
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

मानवी डोळा हा दूरचे पाहण्यासाठी बनला आहे. टेक्नोसॅव्ही जीवनशैलीमुळे ग्रीन टाइम कमी झाला आणि स्क्रीनटाईम वाढला. मुलांमध्ये अ आणि ड जीवनसत्त्वांचा अभाव असल्याने डोळ्यांमध्ये कोरडेपणा वाढतो. या कोरडेपणामुळे डोळ्यांच्या नसांवर ताण येतो. नजर कमजोर होते. लहान मुलांमध्ये १०० पैकी २५ मुलांना जवळचे दिसत नाही. यामुळे चष्मा लागत आहे. सोबतच १५ टक्के मुलांना आपली जवळची नजर कमजोर झाली हे देखील माहीत नसते. अकाली येणारे अंधत्व घालवायचे असेल तर मुलांची आउटडोअर ॲक्टिव्हिटी वाढवावी. त्यांना सूर्यप्रकाशात पाठवा.

डॉ. अजय अंबादे, डायबेटिक रेटिनोपॅथी तज्ज्ञ, नागपूर.

retinoblastoma eyes
Nagpur News : टेंशन घेऊ नको बाळा, फक्त प्रयत्न कर ! सामन्यापूर्वी आई अर्चनाने दिला होता ओजसला धीर

हृदयविकाराचा धोका

एखाद्याला पुढील सहा महिन्यांत हृदयविकाराचा झटका येणार असेल तर त्याचे संकेत डोळ्याचा पडदा स्कॅन करून ओळखता येऊ शकतात. भविष्यातील मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारच नव्हे तर कॅन्सरचेही निदान करण्यासाठी डोळ्यांचा पडदा स्कॅन करून आजाराचे निदान करणे शक्य होणार आहे. आर्टिफिशियल इटेलिजंसचा आधार घेऊन डोळ्यांच्या पडद्याच्या स्कॅनिंगवरील अभ्यास सुरू आहे, असे डॉ. सचदेवा यांनी सांगितले.

retinoblastoma eyes
Chh. Sambhaji Nagar : आजारी नातेवाइकाला पहायला आले ; अन् दागिने चोरून नेले!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com