Nagpur News : टेंशन घेऊ नको बाळा, फक्त प्रयत्न कर ! सामन्यापूर्वी आई अर्चनाने दिला होता ओजसला धीर

ओजसने चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या कंपाउंड आर्चरी प्रकारात अंतिम फेरी गाठून पदक पक्के केले होते.
nagpur
nagpursakal

नागपूर - ‘मम्मी, फायनलचे खूप टेंशन वाटते गं. मनात सारखी धाकधूक व प्रेशर आल्यासारखे वाटत आहे. काय करू समजत नाही.’ अशा शब्दांत नागपूरचा आंतरराष्ट्रीय तिरंदाज ओजस देवतळेने सामन्यापूर्वी आईकडे आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या.

मात्र आईने टेंशन न घेता ''फोकस्ड'' राहून शंभर टक्के प्रयत्न करण्याचा मुलाला सल्ला देत मोटिव्हेट केले होते. अखेर आईचे हे ‘मोटिव्हेशन’ कामी आले आणि ओजसने शनिवारच्या वैयक्तिक गटाच्या अंतिम लढतीपूर्वीच मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकून कुटुंबीयांसह तमाम भारतीयांना अनोखी सुवर्णभेट दिली.

ओजसने चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या कंपाउंड आर्चरी प्रकारात अंतिम फेरी गाठून पदक पक्के केले होते. त्यानंतर बुधवारी पुन्हा त्याची मिश्र दुहेरीत अग्निपरीक्षा होती. ज्योती सुरेखाच्या जोडीने सुवर्णपदक जिंकून ओजसने ही अग्निपरिक्षा पार केली. सामन्याच्या पूर्वसंध्येला २१ वर्षीय ओजसने चीनमधून घरी आईला (अर्चना देवतळे) फोन करून मनातील भावना बोलून दाखविल्या होत्या. मी उपांत्यपूर्व व उपांत्य लढतीत अजिबात टेंशन घेतले नव्हते. मात्र फायनलचे खूप टेंशन वाटत असल्याचे त्याचे आईला सांगितले होते.

सुवर्णपदक नाही मिळाले तर कदाचित आईवडील नाराज होतील, अशी भीती त्याला वाटत होती. मात्र आईने मुलाला ‘मोटिव्हेट’ करून त्याचा आत्मविश्वास वाढविला.

जवळपास १५ मिनिटे झालेल्या संभाषणात अर्चना यांनी अजिबात ‘प्रेशर’ न घेण्याचा सल्ला दिला होता. त्या ओजसला म्हणाल्या, तुझा गेम खूप चांगला आहे, याची मला कल्पना आहे. त्यामुळे तणाव न घेता खेळला तरीही तू सहजरित्या पदक जिंकू शकतो. ओजसनेही आईच्या सल्ल्यापासून प्रेरणा घेत सामन्यात दडपणाविना खेळ केला आणि देशाला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले. ओजसच्या कामगिरीचा आम्हाला खूप खूप आनंद आहे.

nagpur
Nagpur : मेडिकल व मेयोत ३ दिवसांत ५९ मृत्यू ;खासगीतून मेडिकलमध्ये रेफर केलेल्या ३४ रुग्णांचा समावेश

‘मेडल सेरेमनी’च्या वेळी पोडियमवर उभा असताना जेव्हा भारताचा तिरंगा अभिमानाने फडकत होता, तेव्हा ओजसच्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रू आले होते. हा क्षण आम्हा सर्वांसाठीच खूप भावनिक होता, असे अर्चना यांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले. ओजसची कामगिरी टीव्हीवर पाहतानाचा प्रसंग आयुष्यात कदापि विसरू शकणार नाही, असेही त्या म्हणाल्या. आता देवतळे परिवाराला शनिवारच्या आणखी एका फायनलची उत्सुकता लागली आहे.

nagpur
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

कौतुकाचे आले दिवसभर फोन

ओजसने आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक जिंकल्यानंतर हिंगणा टी-पॉइंट येथे राहणाऱ्या देवतळे परिवारात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कुटुंबातील सदस्य व निवडक नातेवाइकांनी घरीच ''सेलिब्रेशन'' केले. ओजसच्या शानदार कामगिरीबद्दल वडील प्रवीण देवतळे व आई अर्चना देवतळे यांना दिवसभर नातेवाईक, मित्र-मैत्रिणी व प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींचे अभिनंदनाचे फोन आले. शनिवारी महत्त्वपूर्ण सुवर्ण जिंकल्यानंतरच आम्ही फटाके फोडणार असल्याचे प्रवीण यांनी सांगितले.

nagpur
Chh. Sambhaji Nagar : गुंडांकरवी बिल्डरची रो-हाऊसधारकांना बेदम मारहाण! काहींची फुटली डोकी; महिला, मुलांनाही सोडले नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com