

CM Fadnavis Pledges Protection of Tribal Culture and Land
Sakal
नागपूर : ‘‘राज्य सरकार आदिवासींना वनजमिनीचा पट्टा देत आहे व त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करीत आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी राज्य शासन आदिवासी विकास विभागाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. जनजाती वर्षानिमित्ताने राज्य सरकार भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आदिवासींच्या जल, जंगल आणि जमीन व संस्कृतीचे रक्षण करेल,’’ असा विश्वास शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.