AI Alert System For Tiger And Leopard Movement Started In Nagpur
esakal
नागपूर : अलीकडे वाघ आणि बिबट्या गावात येण्याचे प्रकार वाढले आहे. नागपूरसारख्या वर्दळीच्या शहरातील बिबट्या घुसला होता. आता वाघ व बिबट्या शिरण्याची समस्या फक्त वनक्षेत्रालगतच्या गावांमध्ये राहिली नाही. वन्यप्राण्यांचाय हल्ल्यात होणारी जीवितहानी रोखण्यासाठी नागपूर वन विभाग आणि ग्रामीण पोलिसांनी तंत्रज्ञानाचे मोठे पाऊल उचलले आहे. 'एआय' आधारित विशेष सतर्कता यंत्रणा नागपूर ग्रामीण भागात तीन ठिकाणी यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आली असून, पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळील पिपरिया येथे या यंत्रणेने वाघाचा वावर असल्याचा इशाराही (अलर्ट) दिला आहे.