नागपूर : वर्षअखेरपर्यंत ‘एम्स’मध्ये किडनी प्रत्यारोपण

संचालक डॉ. विभा दत्ता : एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टीसाठी कॅथलॅब सुरू
नागपूर : वर्षअखेरपर्यंत ‘एम्स’मध्ये किडनी प्रत्यारोपण
नागपूर : वर्षअखेरपर्यंत ‘एम्स’मध्ये किडनी प्रत्यारोपण sakal
Updated on

नागपूर : नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (एम्स) तीन वर्षे पूर्ण झाली. या तीन वर्षात एम्सचा विकास गतीने झाला. पुढील वर्षापर्यंत एम्समध्ये खाटांची संख्या ९६० होणार आहे. तर या वर्षीच्या अखेरपर्यंत एम्समध्ये किडनी प्रत्यारोपण युनिट तयार करण्यात येणार, असा दावा एम्सच्या संचालिका मेजर जनरल (निवृत्त) डॉ. विभा दत्ता यांनी आज येथे केला.

एम्सच्या तिसऱ्या स्थापना दिनाचे निमित्त साधून डॉ. दत्ता यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एम्‍सचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार उपस्थित होते. सध्या साडेतीनशे खाटा एम्समध्ये आहेत. पन्नास टक्के खाटांवर रुग्ण दाखल आहेत. कोरोना काळात कठिण काळात एम्सने पुढाकार घेत स्वतंत्र कोविड युनिट तयार केले.

तीन वर्षांत ५० वरून १२५ पर्यंत एमबीबीएस विद्यार्थी क्षमतेत वाढ आगामी वर्षांपर्यंत ९६० खाटांचे होणार सीव्हीटीएस, युरॉलॉजी, मेंदूरोग विभाग लवकरच तयार होणार एमडी अभ्यासक्रमाच्या ३२ जागांना मंजुरी, २५ प्रवेश झाले

२ हजार ६०० पेक्षा अधिक कोरोनाबाधितांवर उपचार केले. सद्या गैरकोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेष असे की, पोस्ट कोविड उपचार एम्समध्ये उपचार सुरू झाले आहेत. एम्समध्ये औषधशास्त्र, कान- नाक- घसा रोग विभाग, श्वसनरोग विभाग, बालरोग विभाग, ह्रदयरोग विभाग, नेफ्रोलॉजी विभाग, दंत उपचार विभाग, नेत्ररोग विभाग, स्त्री व प्रसूतीरोग विभागसह काही क्लिनिकल विभाग आहेत. अद्ययावत कोरोना तपासणी प्रयोगशाळा तयार करण्यात आली असून ३ लाखांवर कोरोनाबाधितांचे नमुने तपासले.

नागपूर : वर्षअखेरपर्यंत ‘एम्स’मध्ये किडनी प्रत्यारोपण
...म्हणून ग्रामस्थांनी मंत्र्यांवर फेकले शेण

एम्सचा तिसरा स्थापना दिन आज

एम्सचा तिसरा वर्धापनदिन सोहळा रविवारी (ता.२६) सकाळी ९ वाजता ऑनलाइन आयोजित करण्यात आला आहे. स्थापना दिन समारंभात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, खासदार डॉ. विकास महात्मे, एम्सचे अध्यक्ष डॉ. पी. के. दवे हे ऑनलाइन तसेच काही पाहूणे प्रत्यक्षरीत्या सहभागी होणार आहेत.

एम्समध्ये उपचाराला येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा उभारण्यात आली आहे. सध्या ६० खोल्या उपलब्ध आहेत. माफक दरात त्यांच्या राहण्याची सोय आहे. विशेष असे की, हृदयरुग्णांसाठी आवश्यक कॅथलॅब सुरू झाली आहे. आतापर्यंत ६० एन्जिओग्राफी तर २० एन्जिओप्लास्टी झाल्या आहेत.

-डॉ. विभा दत्ता, संचालक- एम्स, नागपूर.

एम्समध्ये बाह्यरुग्ण विभागात रुग्णाची संख्या वाढली. दररोज १२०० रुग्णांची नोंद होते. एम्समध्ये १ हजार ७२७ गरीब रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य अभियान योजनेचा लाभ देण्यात आला. प्रधानमंत्री आरोग्य योजनेचा लाभ येथे मिळत आहे.

-डॉ. मनीष श्रीगिरीवार, वैद्यकीय अधीक्षक, एम्स, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com