
नागपूर : हवाईसुंदरीचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
नागपूर - हवाईसुंदरीसोबत जवळपास दीड वर्ष संबंधात राहिल्यानंतर तिने लग्नाला नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकराने तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अल्पेश राजपाल शेंडे (२२) रा. पंचशील नगर असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित तरुणी ही १७ वर्षाची आहे. बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर ती एअरहोस्टेसचे प्रशिक्षण घेत आहे. पीडिता व अल्पेशची गेल्या दीड वर्षापासून ओळख आहे. एका टूरमध्ये दोघे भेटले. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. दोघांनीही एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. सतत संपर्कात राहिल्याने त्यांच्यात प्रेम फुलले. प्रेमाच्या आणाभाका घेत दोघांमध्ये संबंध प्रस्थापित झाले. अल्पेश हा तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. मात्र, तो कोणताही काम धंदा व शिक्षण घेतले नसल्याने प्रेयसी त्याच्यासोबत लग्न करण्यास टाळत होती.
दरम्यान त्याने लग्नासाठी तगादा लावला. ती लग्नास तयार होत नसल्याचे बघून त्याने दोघांचे सोबत असलेले फोटो व व्हीडिओ सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी दिली. बदनामीच्या भीतीपोटी पीडित तरुणीने संतापून पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.
Web Title: Nagpur Air Hostess Marriage Threat Crime Kapil Nagar Police Filed Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..