Nagpur Air Pollution: उपराजधानीत प्रदूषणाचा कहर! हवेची गुणवत्ता खालावलेलीच
Nagpur Records 30 Polluted Days in November: नागपूरमध्ये नोव्हेंबर महिन्यात एकही दिवस हवा स्वच्छ नव्हती, असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. पीएम २.५ वाढीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
नागपूर : उपराजधानीतील हवेची गुणवत्ता ऑक्टोबरपेक्षा नोव्हेंबरमध्ये अधिकच प्रदूषित झाल्याचे समोर आले आहे. या महिन्यातील तीसही दिवस हवा प्रदूषित होती. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.