

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (एआयईएसएल)च्या देखभाल, दुरुस्ती व ओव्हरहॉल (एमआरओ) केंद्रात सहा वर्षांपासून उड्डाणाविना अडकून पडलेले बोईंग ७७७ विमान अखेर फेब्रुवारीत पुन्हा आकाशात झेप घेण्याची शक्यता आहे. या घडामोडीकडे विमान वाहतूक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.