Nagpur Crime
esakal
नागपूर : अजनी भागातील जयवंतनगर येथे निर्माणाधीन इमारतीच्या खोलीत ३३ वर्षीय युवकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत (Nagpur Crime) आढळला. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. हा जळून झालेला मृत्यू नसून ती गळा आवळून हत्या करण्यात आल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून पुढे आली आहे.