

Nagpur-Amravati Highway Potholes
esakal
बाजारगाव: नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील दत्तवाडी ते कोंढाळी या सुमारे ४० किलोमीटरच्या टोल मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दररोज लाखो रुपयांचा टोल वसूल केला जात असतानाही महामार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती होत नसल्याने वाहनचालक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.