Nagpur : अरुण गवळीला सुरक्षेविना पॅरोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arun Gawli's application

Nagpur : अरुण गवळीला सुरक्षेविना पॅरोल

नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन डॅडी ऊर्फ अरुण गवळीने मुलाच्या लग्नासाठी मागितलेल्या अभिवचन रजेला (पॅरोल) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजुरी दिली आहे.गवळीने मुलाचे लग्न असल्याने पॅरोल मिळावा म्हणून कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला. प्रशासनाने चार दिवसांचा पॅरोल मंजूर करीत पोलिस फौजफाट्यासह नियोजित स्थळी जावे, अशी अट घातली. या विरोधात गवळीने नागपूर खंडपीठात फौजदारी याचिका दाखल करीत विना सुरक्षा आठ दिवसांचा पॅरोल मिळावा म्हणून न्यायालयाला विनंती केली.

सर्व बाजू लक्षात घेत न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर चार दिवसांचा पॅरोल मंजूर केला. १७ नोव्हेंबर रोजी डॅडीच्या मुलाचे लग्न असून अतिरिक्त चार दिवसांच्या पॅरोलसाठी कारागृह प्रशासनाकडे अर्ज करण्याची मुभा न्यायालयाने दिली.