
नागपूर : राज्यातील लोकसंख्या गणना झाल्यानंतर मतदारसंघांची नव्याने रचना केली जाणार आहे. त्यानंतर आमदारांची संख्यासुद्धा वाढणार असल्याचे सांगण्यात येते. असे झाले तर हिवाळी अधिवेशनात एवढे आमदार कसे बसणार यासाठी राज्य शासनाच्यावतीने आतापासूनच तयारी केली जात आहे.