ATM Theft : ३३ एटीएम फोडणारी टोळी जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur ATM Theft Gang

ATM Theft : ३३ एटीएम फोडणारी टोळी जेरबंद

नागपूर : नागपुरातील एक दोन नव्हे तर ३३ एटीएममधून चोरी करणाऱ्या उत्तरप्रदेशातील टोळीला जेरबंद करण्यात तहसि पोलिसांना यश आले आहे. यावेळी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे ही टोळी शनिवार आणि रविवारी या दोन दिवशीच चोरी करीत असल्याची माहिती समोर आहे.

राहुल राकेश सरोज (वय २४, रा. जलेश्वरगंज खंडवा), अशोक श्रीनाथ पाल (वय २६) आणि संजय शंकरलाल पाल (वय २३, सर्व रा. प्रयागराज, उत्तरप्रदेश) अशी आरोपी चोरट्यांची नावे आहेत. अशोक याला यापूर्वीही अशाच एका प्रकरणात औरंगाबाद पोलिसांनी अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील विविध एटीएममधून पैसे चोरीला जात असल्याची माहिती समोर आली होती. त्यातून पोलिसांनी तपासास सुरुवात केली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी या टोळीने तहसील पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दोन एटीएममधून पैसे चोरी केले. याप्रकरणी तहसील पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सीसीटीव्ही व खबऱ्यांच्या आधारे चोरट्यांची माहिती काढण्यास सुरुवात केली. रविवारी ही टोळी सीताबर्डी पोलिस स्टेशनच्या हद्दीत आल्याची माहिती तहसील पोलिसांना मिळाली. तहसील पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली. आतापर्यंत ३३ एटीएममधून पैसे काढल्याची माहिती या तिघांनी दिली. दरम्यान चौकशीत अनेक गुन्हे समोर येणार असल्याचेही शक्यता नाकारता येत नाही.

तीन महिन्यातून यायची एकदा नागपुरात

पोलिसांना टोळीतील आरोपींना अटक केल्यावर तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले. त्यात चोरीच्या उद्देशाने ही टोळी तीन महिन्यातून एकदा नागपुरात येत असल्याची माहिती समोर आली. एकाच वेळी एक डझनपेक्षा अधिक एमटीएममधून पैसे चोरी करून परत जायची. मात्र, यावेळी ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

Web Title: Nagpur Atm Theft 33 Accused Gang Arrested Jail Tehsil Police Action

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..