Maharashtra ATS latest action in Nagpur
esakal
मंगेश गोमासे
नागपूर : पाकिस्तानस्थित कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी, आबिद जाट आणि राणा हनेने यांच्या कथित संपर्कात असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी नागपूरसह गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांत एकाच वेळी धाडसत्र राबवून दहा युवकांना ताब्यात घेतले आहे. सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या या कारवाईत नागपूर विभागाच्या पथकाने संशयितांची चौकशी सुरू केली असून, अकोला येथेही अशाच प्रकारची कारवाई झाल्याची माहिती एटीएसकडून मिळाली आहे.