
नागपूर : उधारीच्या पैशाच्या वादातून चौघांनी मिळून ऑटोडिलरचा व्यवसाय असलेल्या ३१ वर्षीय युवकाचे अपहरण करीत, त्याच्या मारहाणीच्या व्हिडिओ ‘स्नॅपचॅट’या सोशल मीडिया प्लॅटफार्मवर अपलोड केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी (ता.२८) समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चारही आरोपींना दोन तासांत अटक केली.