

Nagpur Fire
sakal
नागपूर : झिंगाबाई टाकळी भागातील बाबा फरीदनगरमध्ये लागून असलेल्या दोन डेकोरेशन व फॅब्रिकेशनच्या दुकानाला आणि एका घराला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, एका डेकोरेशनच्या दुकानाचे संपूर्ण साहित्य जळून राख झाले. यात सुमारे १ कोटी ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दिली. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. सहा गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.