

Bacchu Kadu
sakal
नागपूर : संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी आज राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटल्याचे चित्र पाहायला मिळाले. माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि अन्य शेतकरी नेत्यांनी एक पाऊल मागे घेत उद्या (ता.३०) राज्य सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली.