
Viral Video: नागपुरात एका बिअर बारमध्ये सरकारी कामाच्या फाइल्सवर सह्या करण्यात येत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. दारूचे घोट रिचवत प्रशासकीय काम होत असल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी मनीषनगरातील एका बिअर बारमध्ये ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहेत. तिघेजण भरदुपारी दारू पीत असताना त्यांच्या टेबलवर महाराष्ट्र शासनाच्या फाइल्स होत्या.