
नागपूर : दहा वर्षांच्या कैवल्यचे खेळण्या बागडण्याचे दिवस. परंतु, उलटी झाली आणि त्याला ठाणे येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे नऊ दिवस उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आई वडिलांनी त्याला नागपुरातील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कैवल्यचा जीव वाचविण्यासाठी येथील बालरोगतज्ज्ञांनी प्रयत्न केले.