esakal | आकाशवाणी केंद्रावर झळकली आदिवासी दुर्गम भाग असलेल्या विक्रमगडची भाग्यश्री | Nagpur
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी दुर्गम भाग असलेल्या भाग्यश्री

आकाशवाणी केंद्रावर झळकली आदिवासी दुर्गम भाग असलेल्या भाग्यश्री

sakal_logo
By
अमोल सांबरे

नागपूर : शाळेबाहेरची शाळा अंतर्गत विक्रमगड तालुक्यामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेटवाली येथील विद्यार्थिनी भाग्यश्री गणेश काटकरी आणि तिची ममता गणेश काटकरी या दोघींची मुलाखत नागपूर आकाशवाणी केंद्रावरून 9 ऑक्टोबर 2021 रोजी 10.35 मिनिटांनी प्रसारित करण्यात येत आहे.

“शाळे बाहेरची शाळा” सदर उपक्रम नागपूर विभागीय आयुक्त यांच्या प्रेरणेने प्रादेशिक विद्या प्राधिकरण रविनगर नागपूर प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विध्यमाने राबिवला जातो.

हेही वाचा: स्वरस्वतीच्या रूपातून कलेची उपासना; वैदर्भीय भाषेतून मनोरंजन

नागपूर आकाशवाणीवर “ शाळा बेहेरची शाळा “ या अभिनव कार्यक्रमाचा 206 वा भाग शनिवार सकाळी 10.35 मिनिटांनी रेडीओ ,you tube वर live प्रसारित झाला. यामध्ये इयत्ता 3 री ते 5 वी मुलांसाठी च्या भाषा विषयातील अभ्यास “एखादे चित्र घ्या चित्र पाहून त्यावर एखादी गोष्ट सांगा “ या विषयी विध्यार्थिनी भाग्यश्री काटकरी हिची निवड केली आहे .या साठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन चे जिल्हा समन्वयक प्रशांत गावळे , लक्ष्मण हाडळ व सहकरी सुवर्णा माली यांची खूप मोलाचे सहकार्य लाभले.विक्रमगड सारख्या दुर्गम भागातील खेडा-पाड्यात राहणारी भाग्यश्री आकाशवाणीवर आपली मुलाखत सादर केल्याने तीचे विक्रमगड भागात कौतुक करण्यात येत आहे.

loading image
go to top