Nagpur: भाजपला OBC नेत्यांचे नेतृत्व मान्य नाही; नागपूरातून जयंत पाटलांचा भाजपवर निशाना

एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारले, पकंजा मुंडे यांना पराभूत केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलsakal

नागपूर : एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारले, पकंजा मुंडे यांना पराभूत केले. भाजपच्या कार्यकाळात मंत्रिमंडळात असताना चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांना पुन्हा उमेदवारीच देण्यात आली नाही. यावरून भाजपला ओबीसी नेतृत्वच अमान्य असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

रेशीमबाग येथील महात्मा फुले सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शनिवारी आयोजित दोन दिवसी ओबीसी कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. यावेळी अजित पवार, विचारवंत हरी नरके, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार अमोल मिटकरी, आमदार देवेंद्र भुयार, बसवराज पाटील, रमेश बंग, ईश्वर बाळबुधे, दुनेश्वर पेठे, शेखर सावरबांधे, प्रवीण कुंटे, अरविंद भाजीपाले, अरुण पवार, सुबोध मोहिते, कार्याध्यक्ष राजू राऊत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले, ओबीसींचे नेतृत्व करणारे छगन भुजबळ यांना भाजप सरकारने तुरुंगात टाकले. लालुप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव यांच्यामागे ईडी लावली, आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यामागे सरकार लागले. राम मंदिराची पायाभरणी केली तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती कोविंद यांना तर नव्या संसदभवानाच्या उद्‍घाटनाला आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावण्यात आले नाही.

भाजपचे हे संकेत आणि विचारधाराही लक्षात ठेवा. कोशयारी यांनी राज्यपाल असताना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा आणि ज्योतिबा फुले यांचा वारंवार अपमान केला. हे सर्व जाणीवपूर्वक केल्या गेले. दिल्लीतील महाराष्ट्र भवनातील सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवण्यात आले. सावित्रीबाईंनी मुलींसाठी सुरू केलेल्या पहिल्या शाळेबाबत बदनामीकारक लेखन केले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
Nagpur :नागपूरात शंभरावर उद्यानांचा होणार कायापालट

जातीनिहाय जनगणना केल्यास केल्यास कोणाची लोकसंख्या किती याची आकडेवारी समोर येईल आणि त्यानुसार निधी द्यावा लागले, त्यामुळे यास भाजप विरोध करीत असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. प्रारंभी सर्व पाहुण्यांचे फुले पगडी, महात्मा फुले गौरव ग्रंथ साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक अनिल ठाकरे, संचालन श्रीकांत शिवणकर यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
Nagpur : गद्दारांना धडा शिकवा; ओबीसी आरक्षणाच्या आश्‍वासानाचे काय ; अजित पवार

ओबीसीत फूट पाडण्याचे प्रयत्न ः हरी नरके

मंडल आयोगानंतर सर्वप्रथम राज्यात शरद पवार मुख्यमंत्री असताना ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यात आले. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात अर्थमंत्री या नात्याने अजित पवार यांनी ओबीसींच्या महाज्योतीला सर्वाधिक ६२५ कोटींचे अनुदान दिले. याचे आपल्याला भांडवल करावे लागेल असा सल्ला विचारवंत हरी नरके यांनी शिबिरात उपस्थितांना दिला. ओबीसी समाज भावनेच्या भरात वाहवत जातो.

हे पक्के भाजपला ठावूक आहे. त्यामुळे निवडणुकीत भावनिक मुद्यांचे राजकारण केले जाते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. आता कुणबी, तेली, माळी या मोठ्या जातींना फक्त दोन टक्के तर छोट्या जातींना उर्वरित आरक्षण देण्याचा प्रयत्न करून ओबीसींमध्ये फूट पाडली जात असल्याचे हरी नरके यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com