Nagpur : भाजपला मिळणार यश? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP news

Nagpur : भाजपला मिळणार यश?

नागपूर : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात दिवसभर मोठी राजकीय घडामोड सुरू होती. महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या सदस्यांना जोडण्याचे प्रयत्न कॉंग्रेसचे होते. तर दुसरीकडे सत्ता परिवर्तनसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी व इतरांना आपल्याकडे ओढण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली. कंभालेसह त्यांच्याकडून अनेकांना फोन गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. कंभालेंचा पत्ता किती चालतो व भाजपला किती यश मिळेल, याचे चित्र उद्या स्पष्ट होईल.

हेही वाचा: Nagpur : जी- २० ची बैठक मार्चमध्ये!

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी दुपारी निवडणूक होणार आहे. कॉंग्रेसकडे एकहाती स्पष्ट बहुमत आहे. त्यानंतरही कॉंग्रेसला भाजपचे चांगलाच घाम फोडल्याचे चित्र आहे. कॉंग्रेसने आपल्या सदस्यांना गुप्त ठिकाणी हलविले. काही सदस्य आले नाही. त्यातच नाना कंभाले यांच्या बंडाने व त्यांना दोन सदस्यांची साथ असल्याने कॉंग्रेसच्या चिंतेत भर पडली. आज दिवसभर भाजप नेते व कंभाले यांच्यात चर्चा झाली.

हेही वाचा: Nagpur : जी- २० ची बैठक मार्चमध्ये!

कॉंग्रेस, राष्ट्रवादी व इतर पक्षांच्या सदस्यांसोबतही संपर्क साधल्याची माहिती आहे. कंभालेच्या माध्यमातून भाजपची दिवसभर जुळवाजुळव सुरू होती. कॉंग्रेस, राष्ट्रवादीला सुरुंग लावण्यासाठी वरिष्ठांकडून जिल्ह्यातील नेत्यांना पूर्ण समर्थन होते. त्यामुळे शर्थीचे प्रयत्न लावण्यात आले. रात्री उशिरापर्यंत जुळवाजुळवाचे काम सुरू होते. भाजपकडे १४ तर शिवसेनेचे (शिंदे गट) १ सदस्य त्यांच्यासोबत आहे. बहुमतासाठी ३० चा आकडा हवा आहे. काही वेळासाठी आकडा निम्म्याच्या जवळ गेला होता. त्यामुळे प्रत्यक्षात किती यश मिळते हे उद्या स्पष्ट होईल.

हेही वाचा: Nagpur: फडणवीसांच्या नागपूरमध्येच भाजपला धक्का; 13 पैकी 9 पंचायत समित्या काँग्रेसकडे

भाजपचा उमेदावर कोण?

अध्यक्षपद अनुसूचित जमातासाठी राखीव असून निती वलकेच्या माध्यमातून त्यांच्याकडे एक सदस्य आहे. नाना कंभाले यांनी बंडखोरी केली असून काही सदस्य जोडण्याचा आकडा त्यांनी भाजपला दिल्याचे समजते. कॉंग्रेसचे अनुसूचित जमातीचे सदस्य प्रतम कवरे सायंकाळपर्यंत कॉंग्रेसच्या तंबूत परतले नव्हते. कंभालेंसोबत ते राहिल्यास भाजप अध्यक्षपदासाठी त्यांना समर्थन देईल की वलके यांना उमदेवारी देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदासाठी कंभाले हे भाजपचे उमेदवार असतील की दुसरा उमेदवार देतील, हे ही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.