Nagpur: भाजपमध्ये बंडाचे निशाण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

नागपूर : भाजपमध्ये बंडाचे निशाण?

नागपूर : विधान परिषदेसाठी महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तसेच नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांचे नाव समोर येताच भाजपमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. एका स्वयंसेवकाने या विरोधात बंडाचे निशान फडकवण्याचा इरादा दर्शवला असल्याने भाजपात सर्व आलबेल नाही हे स्पष्ट होते. ते आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास मताधिक्य असतानाही भाजपला निवडणूक जिंकणे अवघड जाऊ शकते.

विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. भाजपकडे सुमारे ६० मतांचे मताधिक्य आहे. त्यामुळे आपण आरामात जिंकू असा कयास भाजपच्या नेत्यांचा आहे. निवडणुकीसाठी मोठी रसद लागणार असल्याने तशाच उमेदवाराचा शोध घेतल्या जात आहे. यात वीरेंद्र कुकरेजा हे चपखल बसतात. माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ते खास मर्जीतील आहेत. त्यांचे वडीलसुद्धा स्वयंसेवक होते. यापूर्वी लोकसभेचीही उमेदवारी त्यांना भाजपने दिली होती. त्यामुळे आजच्या तारखेला कुकरेजा यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. असे असले तरी भाजपमधील एका गटाचा कुकरेजा यांच्या नावाला विरोध आहे. एकतर्फी निर्णय घेतल्यास पदवीधर निवडणुकीमध्ये जे झाले त्याची पुनरावृत्ती होईल, असाही इशारा अप्रत्यक्षपणे दिला जात आहे.

हेही वाचा: T20 WC ENG vs NZ : इंग्लंडच्या पदरी झिरो; न्यूझीलंड ठरला हिरो

बंडाचे निशान फडकवण्याच्या तयारीत असलेल्या भाजपच्या नेत्याने मतदारांच्या यादीची जुळवाजुळव सुरू केली आहे. आम्ही अनेक वर्षांपासून भाजपचे काम करीत आहोत. महापालिकेतही सातत्याने निवडून येत आहोत. राहिला संघाचा प्रश्न तर आज तिसरी पुढी संघाच्या शाखेत जात आहे. आम्ही महापालिकेत खेळत राहायचे आणि कानामागून आलेल्यांना आमदार करायचे हा कुठला न्याय आहे, असा संतप्त सवाल या स्वयंसेवकाचा आहे. विधान परिषदेसाठी आज जे नाव आघाडीवर आहे त्यांचे भाजपमध्ये काय योगदान आहे, असेही स्वयंसेवकाचे म्हणने आहे.

loading image
go to top