
नागपूरमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलीय. बॉडी बिल्डर असलेल्या संकेत बुग्गेवार हा एमडी तस्करी करत होता. त्याला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. संकेत हा माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा आहे. पोलिसांना त्याच्याकडे १६ ग्रॅम एमडी पावडर आढळली असून त्याची किंमत १.६७ लाख इतकी आहे. संकेतकडून एमडी पावडरसह जवळपास १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती समोर आलीय.