

BJP Denies Ticket To Fadnavis Close Aide In Nagpur
Esakal
राज्यात महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राजकीय पक्षांकडून बंडखोरी टाळण्यासाठी अखेरच्या क्षणी उमेदवारी जाहीर केली जात आहे. तर काही पक्षांनी थेट एबी फॉर्म वाटप केले आहेत. भाजपनं अनेक ठिकाणी यादी जाहीर करण्याआधी एबी फॉर्म उमेदवारांना दिलेत. यामुळे काही कार्यकर्ते, नेत्यांनी नाराजीही व्यक्त केलीय. आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपूरमधील विश्वासू नेत्यालाच उमेदवारी नाकारण्यात आलीय. ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानं नेत्यानं पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय.