

Nagpur News
esakal
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील स्मशानभूमीतून दोन मृतदेहांच्या राख आणि अस्थी गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. जादूटोणा, मंत्र-तंत्र आणि तांत्रिकांच्या गॅंगचा संशय व्यक्त होत असून, पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण कार्तिक पौर्णिमेच्या (त्रिपुरारी पौर्णिमा) पार्श्वभूमीवर घडल्याने रहस्य आणखी गडद झाले आहे.