Nagpur Board: दहा टक्क्यांनी निकाल वाढविण्याचे बोर्डाचे उद्दिष्ट;वर्षभर गुणवत्तावाढीचा कृती आराखडा

Nagpur Board Targets 10% Result Growth : दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल दहा टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने ठेवले आहे. त्यासाठी वर्षभर सराव परीक्षा, विषयवार निकालाचे विश्लेषण, विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन आणि कॉपीमुक्त परीक्षेसाठी जनजागृती केली जाणार आहे.
Nagpur Divisional Education Board plans year-round measures to improve Class 10 and 12 examination results.

Nagpur Divisional Education Board plans year-round measures to improve Class 10 and 12 examination results.

esakal

Updated on: 

नागपूर : दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल दहा टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने निश्चित केले आहे. त्यासाठी केवळ परीक्षेच्या काळात नव्हे, तर संपूर्ण वर्षभर शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या स्तरावर गुणवत्तावाढीच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागीय मंडळाने ‘ध्यास गुणवत्तेचा... लढा गैरमार्गाशी...’ या संकल्पनेतून गुणवत्तावाढीचा आराखडा तयार केला आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालात दहा टक्के वाढ साध्य करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Loading content, please wait...